महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उद्देश:-
- सहकारी संस्थांचे सभासद, भावी सभासद,सहकारी कार्यकर्ते आणि सहकारी संस्थांमधील सेवक यांना सहकारी शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे,करवून घेणे तसेच सहकारी तत्वे, मुल्ये व कार्यप्रणाली लोकप्रिय करणे.
- सहकारी शिक्षणासंबंधीच्या सर्व बाबतीत एकसुत्रता घडवून आणणारी संस्था म्हणून काम करणे आणि सहकारी शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांच्या बाबतीत तज्ञ संस्था म्हणून काम करणे.
- महाराष्ट्र राज्यातील सहकारी चळवळीवर परिणाम करणा-या निरनिराळ्या प्रश्नावर सहकारी कार्यकर्त्याच्या मताचे दिग्दर्शन करण्यास व योग्य त्या अधिकारी व्यक्तिपुढे किंवा ठिकाणी असे मत मांडण्यास राज्यातील सहकारी चळवळीचा प्रवक्ता म्हणून काम करणे,आणि या विषयाचा प्रचार करून या बाबत जनमत तयार करणे.
- सहकारी चळवळीच्या प्रसारास मदत करणे.
- सहकारी चळवळी संबंधीच्या प्रश्नांचा अभयास करणे व अशा कार्यास उत्तेजन देणे।तसेच सहकारी चळवळीसंबंधीचे संशोधन हाती घेणे।अशा कार्यास चालना देणे.शिवाय राज्यात सहकारी क्षेत्राचे संदर्भात सल्ला देणारे सेवा केंद्र म्हणून काम करणे.
- शिक्षण व प्रशिक्षण वर्ग जिल्हा सहकारी बोर्ड व सहकार प्रशिक्षण केंद्र अगर महाविद्यालये तसेच सहकारी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था चालविणे.
- सहकार ग्रामिण विकास आणि तत्संबंधीच्या विषयावर नियतकालीके,पुस्तिका, पुस्तके आदी प्रकाशित करणे.
- सहकारी संस्थांतील परस्पर संबंध वृध्दींगत करणे आणि विविध क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी मदत करणे.