Welcome To Maharashtra Rajya Sahakari Sangh Maryadit, Pune
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., सन १९१७ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या परिषदेस महात्मा गांधी उपस्थित होते. त्यांनी या परिषदेत सहकाराचे नैतिक अधिष्ठान या विषयावर एक टिपणी सादर केली होती. या परिषदेत सहकारी खाते व सहकारी संस्था यांचेविषयी सखोल चर्चा झाली आणि सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांना व सेवकांना शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी आणि सहकारी सहकारी चळवळीतील प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी व सहकारी चळवळीचा प्रवक्ता म्हणून काम करण्यासाठी राज्य पातळीवर एक वेगळी संस्था स्थापन व्हावी असा निर्णय घेण्यात आला. हि चर्चा राजा बहादूर तालमकी यांनी सादर केलेल्या प्रबंधावर आधारित होती. या चर्चेचे फलीत म्हणून १३ जुलै १९१८ रोजी बॉम्बे सेंट्रल को-ऑपरेटिव्ह इन्स्टिट्युट म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ निर्माण झाला.
या संस्थेचे अध्यक्षस्थान संस्थेच्या स्थापनेपासून ते १९२६ पर्यंत ब्रिटिश गव्हर्नरांनी भूषविले.